- प.पु.डॉ.बापुजी साळुंखे.
गुरुदेव कार्यकर्त्यांना आवाहन
प्रस्तावना
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे म्हणजे एक ध्येयवादी
शिक्षण प्रसारक आणि शिक्षण प्रसारातून समाज परिवर्त
नाचे स्वप्न पाहणारा एक द्रष्टा समाजचिंतक आजपर्यंत
समाजात उत्तमोत्तम तत्वज्ञान सांगणारी माणसे खूप होऊन
गेली परंतु समनावर त्यांचा प्रभाव फार काळ टिकला नाही.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्यासारख्या एखाद्या
दुर्मिळ महामानवाच्या ठिकाणी मात्र उक्ती आणि कृती
याचा असा काही सुंदर संगम झाला की,
त्यांच्या व्यक्तिमत्वातून क्रांती घडवण्याची शक्ती
ओसंडून वाहू लागते आणि अशा अलौकिक व्यक्तीच्या
कार्याची मुद्रा समाज आपल्या काळजावर कोरून ठेवायला
तयार असतो. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत आपल्या कार्याने
एवढे मोठे योगदान दिले आहे की, समाज
मनावरची त्यांची मुद्रा चिरंतन आहे. म्हणूनच आगामी
२०१८-१९ या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बापूजींच्या कार्यकर्तुत्वाप्रती
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत.
बापूजींचे चरित्रदेशभक्त क्रांतीकारकांची भूम्हणून ओजाणाऱ्या
सातारा जिल्ह्याला लढवय्या वीराबरोबरच संत परंपरेचाही
वारसा लाभलेला आहे. हा वारसा जपत गोविंद ज्ञानोजीराव
साळुंखे म्हणजेच बापूजी साळुंखे यांचा जन्म सातारा
जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर येथे दि.९ जून,
१९१९ रोजी झाला. बापूजी साधारणपणे वर्षाचे अत्यांचे मातृछत्र
हरपले आणि मराठी सातवीमध्ये शिकत असताना
त्यांचे पितृछ्त्रही हरपले. आणि बापूजींच्या खडतर जीवन
प्रवासाची सुरुवात झाली.
पोरक्या बापूजीना इस्लामपूरच्या राम मंदिरात राहावे लागले.
प्रभू रामचंद्राच्या त्यागाचा संस्कार घेत बापुजींनी
प्रसंगी वार लावून, उपाशी पोटीराहून आपले माध्यमिक शिक्षण
पूर्ण केले. तसेच डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या छ्त्रछायेखाली
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
याच दरम्यान १९४० मध्ये त्यांचा विवाह सुशीलादेवी यांचेशी झाला.
आगुरु डॉ.अप्पासाहेब पवार यांची आज्ञा म्हणून बापूजी सोंडूर
संस्थानाचा इतिहास लिहिण्यासाठी गेले. तेथे राजगुरू म्हणूनही
त्यांनी कार्य केले पण १९४२ साली देशभर उसळलेल्या क्रांतीलढ्याची
हाक त्यांना स्वस्थ बसू देईना. या हाकेला ओ देत, राजवैभवाचा
त्याग करीत बापुजींनी स्वातंत्र संग्रामात उडी घेतली आणि महात्मा
गांधींचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवत स्वंतंत्र लढ्यात सहभाग घेतला.
आचार्य विनोबाजी भावे यांच्या भूमिगत चळवळीत योगदान दिले.
भारत स्वतंत्र झाला. बापुजींचे अनेक सहकारी समाजकारण,
राजकारण आणि सहकार यात सक्रीय झाले. परंतु बापुजींनी
आपल्या पूर्वायुषात स्वतः सहन केलेले गरीबीचे चटके आणि
दैन्यावस्था लक्षात घेत आपल्या जीवनाचा मार्ग आखला.
समाजातील गरीबी, दारिद्र्य, दुरावस्था त्यांना अस्वस्थ करीत होती.
या साऱ्यांसाठी शिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे हे बापुजींनी
ओळखून आपले जीवनाचे धेय निश्चित केले. आपण कशासाठी
जगायचे आणि कशासाठी समर्पित व्हायचे हे त्यांनी ठरविले आणि या
जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राची शैक्षणिक
भूक भागविण्याचा वसा आपल्या शिरावर घेतला.

संस्थेची स्थापना प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून
रयत शिक्षण संस्थेत काम केल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या

शिक्षणविचाराला डोळ्यांसमोर ठेवून १९५४ साली कराड येथील
कृष्णा-कोयनेच्या संगमावर असलेल्या मुरलीधर मंदिरात
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. यानंतरचे
बापूजींचे आयुष्य आणि संस्थेचा इतिहास जणू काही एकरूप
होऊन गेला.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसारक या
बापूजींनी दिलेल्या ध्येयवाक्याने प्रेरीत होवून आज संस्थेची ३८५
संस्कृती केंद्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमाभागात
ज्ञानदानाने महाराष्ट्र घडविण्याचे, पर्यायाने देश घडविण्याचे पवित्र
कार्य करीत आहेत. आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही
महाराष्ट्रातील एक प्रगत आणि गुणवंत अशी शैक्षणिक प्रयोगशाळा
झालेली आहे. जवळपास नऊ हजार गुरुदेव कार्यकर्ते बापूजींच्या
ध्येयवादाची आणि तत्त्वज्ञानाची पताका खांद्यावर घेऊन अविरत
वाटचाल करीत असून लाखो विद्यार्थांचे आयुष्य घडवित आहेत.

आकर्षक व्यक्तिमत्व पण साधी राहणी. अंगावर साधे खादीचे कपडे,
पायजमा, सदरा, टोपी, खांद्यावर शाल असे बापूजींचे
व्यक्तिमत्व आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांचे पवित्र विचार,
मृदुभाषा, बुध्दीचे ऐश्वर्य आणि वाणीचे माधुर्य या बळावर
त्यांनी साऱ्या समाजाला प्रभावित केले. तो प्रभाव आजही समाजावर
कायम आहे.

जन्मशताब्दी वर्षाचे महत्व
सन २०१८-१९ हे बापूजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. संस्थेतील गुरुदेव
कार्यकर्ते म्हणून आपण नशीबवान आहोत की,
आपणाला ही जन्मशताब्दी साजरी करण्याचे भाग्य मिळत आहे कारण
९ जून हा केवळ बापूजींचा जन्मदिन नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो
खऱ्या अर्थाने कृतज्ञता दिवस आहे! या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा आपणांस बापूजींच्या तत्त्वज्ञानाला, विचाराला, कार्याला
आणि त्यागाला उजाळा देण्याची संधी मिळत आहे. म्हणून हे जन्मशताब्दी
वर्ष केवळ एक उत्सव म्हणून साजरे न करता यानिमित्ताने आत्मपरीक्षण
करण्याची संधी आपणांस मिळत आहे. आपल्या प्राणप्रिय मातृसंस्थेसाठी
स्वतःचे वडिलोपार्जित घर, संपती इतकेच नव्हे तर स्वतःला मिळालेले सर्व
गौरव आणि गौरवार्थ मिळालेला लाखो रुपयांचा निधी संस्थेला अर्पण
करून, स्वतः पायी आणि एस.टी, प्रसंगी ट्रकने प्रवास करून महाराष्ट्रभर
संस्कृती केंद्रांचे जाळे वीणणाऱ्या बापूजींचा त्याग हा आपला आदर्श आहे.

संस्था नेहमीच कालानुरूप स्वतःच्या शैक्षणिक ढाच्यात गुणवत्तापूर्ण बदल
घडवीत गतिमान राहिली आहे.
संस्थेच्या प्रगतीची हि गती अशीच पुढे सुरु ठेवण्याबाबत विचारमंथन
करण्याची ही संधी आहे. २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याची
पूर्वतयारी करण्यासाठी २०१७ -१८ हे शैक्षणिक वर्ष आपल्या सर्व
गुरुदेव कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पूर्वतयारी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने
आपापल्या शाखेची गुणवत्ता वाढ व विकास करणे, शाखा समाज्यापर्यंत
पोहोचविणे, सामाज्याचा विश्वास संपादन करणे आणि संस्थेचे,
शाखेचे कार्य समाजापर्यंत घेऊन जाने, समाजाशी सुसंवाद साधने हे
आपणास करावयाचे आहे.
आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपणही स्वतःला बदलाने आवश्यक आहे.
गुणवत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिकतेचा स्वीकार करणे गरजेचे आहे.
त्यासाठी शाखेचा सर्वांगीण विकास करीत
अंतरंग आणि बाहयरंगात बदल करणे आवश्यक आहे.